अन्विता बोराटे ATS परीक्षेत जिल्ह्यात प्रथम..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ATS परीक्षेत अन्विताने इ. २रीत 200 पैकी 188 गुण मिळवत सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
सध्या अन्विता जि. प. शाळा निंबाळकरवस्ती (ता.करमाळा) येथे इ. २रीत शिकत असून तिला या परीक्षेसाठी महेश साळुंखे गुरुजी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे ,केंद्रप्रमुख श्री तोरमल सर,मुख्याध्यापक श्री ठाकर सर,वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके ,शाळा व्यवस्थापन समिती निंबाळकरवस्ती तसेच वांगी परीसरातील सर्व नागरिकांनी अन्विताचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

