इराण-इराक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाचे आवाहन

करमाळा (दि.१) :इराण आणि इराक या देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता सोलापूर जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित इराण किंवा इराक येथे वास्तव्यास आहेत, त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भात मंत्रालय, मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी (EOC) समन्वय साधण्यात आला आहे. इराण किंवा इराकमध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींविषयी चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून सुरक्षिततेबाबत माहिती मिळवून ती संबंधित नागरिकांना कळविण्यात येणार आहे.

या सूचनेची नोंद घेऊन आवश्यकतेनुसार खालील नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले आहे.
नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर नियंत्रण कक्ष : 0217-2731012
सोलापूर पोलीस शहर नियंत्रण कक्ष : 0217-2744600 / 2744620
सोलापूर पोलीस ग्रामीण नियंत्रण कक्ष : 0217-2732000
मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई : 9321590561

