करमाळा एमआयडीसी मधील भूखंड मिळविण्यासाठीच्या अर्ज प्रक्रियेला २३ डिसेंबर पासून सुरुवात

करमाळा (दि.२०) – उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार करमाळा एमआयडीसी पाच ते सहा गुंठ्याचे ९० प्लॉट उपलब्ध करण्यात आले आहे. यापैकी पहिले दहा प्लॉट वितरणासाठी उपलब्ध केले असून २३ डिसेंबर पासून २०२४ ऑनलाईन ही अर्ज प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, यापूर्वी करमाळा एमआयडीसी मध्ये दोन एकर, पाच एकर, दहा एकर असे भूखंड पाडले होते. त्याचे छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून करमाळा एमआयडीसी मधील पाच पाच गुंठ्याचे दहा भूखंड उद्योजकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावेत तसेच या संदर्भात काही मदत लागल्यास शिवसेना कार्यालयाशी देखील संपर्क साधू शकता असे आव्हान चिवटे यांनी केले आहे
हे दहा भूखंडाचे वाटप झाल्यानंतर 60 ते 70 भूखंड वाटपासाठी तयार असून तेही तात्काळ एक वर्षभरात सर्व उद्योजकांना देण्यात येतील. याशिवाय तात्पुरती पाणी पुरवठा योजना करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी चार कोटी रुपये मंजूर केले असून याचेही काम लवकर सुरू होईल अशी माहिती एमआयडीसीच्या विभागीय संचालिका बिरजे यांनी दिली आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गेली पंचवीस वर्षापासून रखडलेला करमाळा एमआयडीसी चा प्रश्न सोडल्याबद्दल
उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यासाठी करमाळातील नव उद्योजकांची शिष्टमंडळ लवकरच मुंबईला जाऊन उद्योग मंत्री नामदार सामंत यांचा सत्कार करण्यात येईल अशी माहिती उद्योजक फुलकुमार शहा यांनी दिली.




