माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी विशाल परदेशी यांची नियुक्ती

करमाळा (दि.८): माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी शहरातील विशाल सुरेशसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी मंगळवारी (दि.७) विशाल परदेशी यांना निवडीचे पत्र दिले आहे.
भारतीय संविधान, भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आचारसंहिता यांचे काटेकोर पालन करण्याचे तसेच या पदावर राहून माहिती अधिकार अधिनियम २००५ चा व्यापक जनहितासाठी वापर करणार आणि सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करणार असल्याचे विशाल परदेशी यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले आहे.
विशाल परदेशी हे करमाळा तालुक्यात पत्रकार म्हणून देखील कार्यरत आहेत. परदेशी यांच्या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.




