कृष्णा खोर्‍यातील वाया जाणारे पाणी उजनी व कोळगाव धरणात आणण्याच्या प्रकल्पाला निधी मंजुर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : कृष्णा-भिमा स्थिरीकरण योजनेस काल राज्य सरकार ने 3326 कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे  सहा जिल्हे आणि बत्तीस तालुक्यातील साडेपाच लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे.  याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला होणार आहे. विशेषता हे पाणी कृष्णा खोर्‍यातून उजनी धरणात येवून पुढे सिना कोळगाव धरण मार्गाने मराठवाडय़ात  जाणार असल्याने करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. यामुळे या योजनेचे जनक व योजनेसाठी पाठपुरावा केल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा करमाळेकरांकडून सन्मान अकलूज येथे करण्यात आला.

यावेळी प्रा.शिवाजीराव बंडगर बोलताना म्हणाले की, अपुऱ्या पावसामुळे उजनी तसेच कोळगाव धरण अनेकदा भरले जात नाहीत. त्यावेळी शेकडो एकर शेती धोक्यात येते. वीज कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागते. कृष्णा खोर्‍यातील वाया जाणारे पाणी उजनी आणि कोळगाव धरणात येणार असल्याने ही समस्या निर्माण होणार नाही. रिटेवाडी उपसासिंचन सारखी योजना ही होवू शकते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार आहे. या योजनेस  काहीनी विरोध करत खिल्ली उडवली होती . परंतु विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली . सतत याचा पाठपुरावा चालूच ठेवला . प्रथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साडे आठ हजार लोकांच्या सहीचे निवेदन त्यांना दिले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही या योजनेचा ध्यास घेतला होता. या सर्वांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व अखेर या प्रकल्पाला काल निधी मंजूर झाला.

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, सदस्य दिलीपदादा तळेकर , आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,उदयसिंह मोरे पाटील, माजी संचालक संतोष खाटमोडे पाटील,वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके ,माणिकराव साखरे, शिवशंकर माने,महेंद्र पाटील, सरडे बापू,औदुंबर भोसले,अमरजीतसिंह साळुंके,महारूद्र पाटील, हनुमंत पाटील, आबा टापरे, चैतन्य पाठक,गणेश घोरपडे,बाळासाहेब महानवर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!