श्रीदेवीचामाळ येथे दोन परिवारात वाद - एका महिलेची विनयभंगाची तर दुसऱ्या महिलेची बलात्काराची फिर्याद - Saptahik Sandesh

श्रीदेवीचामाळ येथे दोन परिवारात वाद – एका महिलेची विनयभंगाची तर दुसऱ्या महिलेची बलात्काराची फिर्याद

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा (ता.२४) : श्रीदेवीचामाळ येथे दोन परिवारातील वादाच्या रूपांतरातून एका महिलेची विनयभंगाची तर दुसऱ्या महिलेची बलात्काराची फिर्याद एका दिवसाआड एक दाखल झाल्या आहेत.

यात पहिल्या फिर्यादीत दिलेल्या महिलेने म्हटले आहे, की २२ ऑगस्टला रात्री आठ वाजता मी माझ्या मुलीला आणण्यासाठी मंदिराकडे जात असताना श्रीदेवीचामाळ येथील तरुणाने मला चिठ्ठी घेण्याचा आग्रह केला, परंतू मी चिठ्ठी घेतली नाही. त्यामुळे त्याने माझा हात पकडून तु माझी चिठ्ठी घे व मला फोन कर.. असे म्हणून माझा विनयभंग केला आहे.

या प्रकरणी पोलीसांनी २३ ऑगस्टला संबंधित तरूणाच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २४ ऑगस्टला (आज) दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात महिलेने म्हटले आहे, की २३ ऑगस्टच्या रात्री साडेआठ वाजता मी माझ्या घरी होते. माझे पती पुणे येथे कामासाठी गेल्याने येथील दोघेजण आले व त्यांनी तुझ्या नवऱ्याने आमच्या चुलतीला फोन नंबर का मागितला.. असे म्हणून शरीराशी लगट केली.

त्यानंतर पुन्हा त्यांचाच नातेवाईक हा दारू पिऊन आलेला होता व त्याने तुझ्या नवऱ्याने माझ्या मावसभावाच्या बायकोचा फोन नंबर का मागितला असे म्हणून वाद घातला व त्यानंतर त्याने माझ्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी दोन्ही फिर्यादीनूसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!