चोरीच्या उद्देशाने लपलेल्यास पोलीसांकडून अटक

करमाळा : चोरीच्या उद्देशाने स्वत:चे अस्तित्व लपवून लपून बसलेल्या प्रौढास पोलीसांनी अटक केली आहे. हा प्रकार १६ मे ला रात्री साडेअकरा वाजता करमाळा शहरात केत्तूर नाक्याजवळ घडला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मिलींद दशरथ दहिहंडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १६ मे ला रात्री गस्त घालत असताना केत्तूर नाका परिसरात नामदेव बबन चुनाडे (वय-५२, रा. अनिलनगर, पंढरपूर) हा अंधाराचा फायदा घेऊन स्वत:चे अस्तित्व लपवून चोरी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेला आढळला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.





