'योद्धा' करिअर ॲकॅडमीचे पोलिस भरतीमध्ये तब्बल 41 विद्यार्थी यशस्वी.. -

‘योद्धा’ करिअर ॲकॅडमीचे पोलिस भरतीमध्ये तब्बल 41 विद्यार्थी यशस्वी..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.२५) : सुभेदार मेजर विलास नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झरे व जेऊर येथे सुरू असलेल्या नाईकनवरे बंधुच्या योद्धा ॲकडमी मधील‌ तब्बल 41 विद्यार्थी पोलिसभरती मध्ये यशस्वी झाले आहेत. यावर्षीच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये करमाळा तालुक्याच्या विविध गावातील अनेक तरुणांनी पोलिस भरतीमध्ये यशस्वी होऊन यश संपादन केले आहे.

याबाबत माहिती देताना श्री.नाईकनवरे यांनी म्हटले की, करमाळा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी यावर्षीची पोलीस भरती वरदान ठरली असून, तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त तरुण- तरुणी यावर्षीच्या भरतीमध्ये यशस्वी ठरले आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील गृहमंत्री झाल्यानंतर पोलीस भरती प्रक्रियेची पुनर्रचना करून त्यांनी यामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला याचा फायदा आजपर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक तरुणांना झाला गुणवत्ता व परिश्रमाच्या जोरावर अनेकांना पोलीस दलामध्ये स्थान मिळाले आहे.

करमाळा तालुक्यात बारावी‌ ते पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले अनेक बेरोजगार तरुण गेल्या सात – आठ वर्षांपासून स्थानिक पोलीस भरती मार्गदर्शन केंद्र व स्वतःच्या घरीच राहून पोलीस भरती चा सराव करत होते यामध्ये अनेकांची घरची परिस्थिती साधारण असल्याने कोणत्याही स्थितीत यशस्वी होणे गरजेचे होते अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीचा पर्याय दिलासादायक ठरत होता. केल्या दोन-तीन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी भरती पुढे ढकलण्याचे प्रकार होत होते त्यामुळे हे तरुण निराशेच्या गर्दीत जाऊ लागले होते परंतु यावर्षी सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयांनी मुळे सर्वच जिल्हा व शहर कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस दलामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये तालुक्यातील योद्धा पोलिस भरती प्रशिक्षण केंद्रातील 41 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. करमाळा तालुक्यातील 31 व तालुका बाहेरील 10 असे एकूण 41 विद्यार्थी भरती झाले आहेत, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ॲकॅडमीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!