मांगी तलावाने तळ गाठल्यामुळे मांगीसह तलावावर अवलंबून असणाऱ्या गावात भीषण पाणीटंचाई

(प्रवीण अवचर,मांगी यांजकडून)
करमाळा – गतवर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे त्याचबरोबर पिण्याच्या राखीव पाण्याचे नियोजन न केल्यामुळे मांगी तलाव आज उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पूर्ण कोरडा पडलेला असून यामुळे मांगी तलावावर पिण्याचे पाणी व शेतीसाठी अवलंबून असणारे मांगीसह रायगाव पुनवर ,उत्तर /दक्षिण वडगाव लोणी . कामोने , पोथरे बिटरगाव , आळजापूर , आधी गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सुरू असून.. राजकीय पुढाऱ्यांकडून मात्र कुकडीच पाणी मांगी तलवात सोडण्या बद्दल फक्त कागदोपत्रीच वलगणा करण्यात येत आहेत.
पावसाळ्यामध्ये जमा झालेल्या मांगी तलावातील आहे त्या पाण्याचं पाटबंधारे विभागाकडून कोणतेही नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना मांगी सह पंचक्रोशीतील गावांना करावा लागतो आहे ,मागील दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मांगीतलाव 99 टक्के , भरून सांडव्यातून पाणी वाहिले होते त्यावेळी सुद्धा स्थानिक ग्रामस्थांनी,सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून पाटबंधारे विभागाला पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यासाठी विनवण्या केल्या परंतु पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले
आज याच कारणामुळे मांगी तलावातील पाणीसाठा पूर्ण संपलेला असून तलाव कोरडा पडत आहे. यामुळे पिण्याच पाणी शेतीसह .जनावराच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे..ऐन उन्हाळ्यात लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे, राजकीय पुढारी मात्र आपापल्या पक्षाच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत.सामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी मात्र गंभीर नसलेले दिसत आहेत .

मांगी तलाव कोरडा पडल्यामुळे येणाऱ्या काळात पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी / त्या गावांच्या मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाईल तसेच पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याच्याही प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही तत्पर हजर आहोत.
– सुजित बागल (अध्यक्ष आमदार श्री संजय मामा शिंदे मोटार वाहतूक संघ, करमाळा)



