राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आश्लेषा बागडेला ब्रॉंझ मेडल - Saptahik Sandesh

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत आश्लेषा बागडेला ब्रॉंझ मेडल

करमाळा (दि.१८) : करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची खेळाडू आश्लेषा बागडे यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये ब्रॉंझ मेडल मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे.

२६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२५  या दरम्यान उत्तराखंड मध्ये झालेल्या 38 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक मिळवत ब्रॉंझ मेडल पटकावले.

आश्लेषा बागडे

आश्लेषाने संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करत आपल्या लौकिकाला साजेल असा खेळ केला. सेमी फायनल मधे तीने हरत असलेली कुस्ती अत्यंत कुशलतेने खेळून दमदार विजयात रुपांतर केले. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.राम काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

आश्लेषाने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे तसेच महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकावले आहे असल्याची प्रतिक्रिया विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी दिली.  संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!