देवळालीच्या सरपंचपदी अश्विनी शिंदे यांची बिनविरोध निवड
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. अश्विनी धनंजय शिंदे यांची रोजी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवार दि. 18 जानेवारी देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती. देवळाली ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य आहेत. त्यातील सहा सदस्य गैरहजर होते. दुपारी दोन वाजेपर्यंत अश्विनी शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर. एच. राऊत यांनी, सौ. शिंदे यांना देवळाली ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून घोषित केले.
या निवडीनंतर उपस्थित समर्थकांनी मोठा जल्लोष करत, फटाके फोडत, गुलाल उधळत तसेच देवळाली येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढत,
यापूर्वीचे सरपंच गहिनीनाथ रामा गणेशकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सदरील सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती.
यावेळी देवळाली ग्रामपंचायत सदस्य सौ. मंदाकिनी रामा कानगुडे, गहीणीनाथ रामा गणेशकर, सौ. आश्विनी धनंजय शिंदे, आशिष कल्याण गायकवाड, पोपट विष्णू बोराडे, सौ. नर्मदा बबन कानगुडे, सौ. सविता संजय चौधरी इत्यादी सदस्य उपस्थित होते.
सदरील सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास अधिकारी नागरसे एस. एम., तलाठी शितल सूर्यवंशी देवळाली ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र चौधरी, मच्छिंद्र गायकवाड, काळू दामोदरे, रेवणनाथ मोरे, धनंजय शिंदे इत्यादींनी उपस्थित राहून ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सर्व सहकार्य केले.