पोलीस स्थानकात दिलेली तक्रार काढून घे असे म्हणत चौघांकडून दोघांस मारहाण - Saptahik Sandesh

पोलीस स्थानकात दिलेली तक्रार काढून घे असे म्हणत चौघांकडून दोघांस मारहाण

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – शेतजमीनीच्या वादातून पोलीस स्थानकात दिलेली तक्रार काढून घे असे म्हणून चौघांनी शिवीगाळी करून मारहाण केली असल्याची घटना खातगाव क्रमांक २ (ता.करमाळा) येथे घडली आहे.

बाळासाहेब शिवाजी रणसिंग, रा खातगाव नंबर 2 ता करमाळा जि. सोलापुर यांनी फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे शेतातील बांधकरी गणेश
दत्तात्रय नवले यांची शेती शेजारी शेजारी असुन या पुर्वी यांच्या मारहानीच्या कारणावरुन करमाळा कोर्टात संदीप दत्तात्रय नवले, महादेव अंबोधरे यांच्याशी वाद चालु आहे.

25/10/2023 रोजी संध्याकाळी 06/00 वाचे सुमारास मी माझे शेतातुन घरी आलो व मी, आई व वडील घरी असताना तेथे माझ्या शेतीचे बांधकरी गणेश दत्तात्रय नवले, संदीप दत्तात्रय नवले, विमल दत्तात्रय नवले, तिघे रा टाकळी ता करमाळा महादेव नाना अंबोधरे रा भिलारवाडी ता करमाळा असे मला घरासमोर मोठमोठ्याने शिवीगाळी करत आले.

त्यावेळी माझे वडील शिवाजी रनसिंग यांनी त्या चौघाना म्हणाले की तुम्ही माझा मुलगा बाळासाहेब यास शिवीगाळ का करीत आहे? असे विचारले असता त्या सर्वानी पुन्हा माझे आई-वडील यांना शिवीगाळी केली. त्यावेळी संदीप दत्तात्रय नवले हा मला म्हणाला की तु आमचे विरुध्द करमाळा पोलीस स्थानकात दिलेली तक्रार काढून घे नाहीतर तुला आजच्या आज जिंवत सोडणार नाही असे म्हणुन धमकी देत असताना सोबत आलेल्या गणेश नवले यांने त्याचे हातातील उस तोडण्याचे कोयत्याने माझे कंबरेवर उजवे बाजुस मारुन जखमी केले तसेच महादेव आंबोदरे याने माझ्या उजव्या कानावर हाताने मारले. आमची भांडणे सोडविण्यासाठी माझे वडील शिवाजी आई केशर व पत्नी वैशाली आले असता विमल दत्तात्रय नवले यांनी शिवीगाळी केली. तसेच संदीप नवले याने माझे वडील शिवाजी रणशिंग यांना लाथाबुक्याने मारहाण केली व माझी आई केशर हिस विमल व पत्नी वैशाली यांना शिवीगाळी केली. तुम्हाला आज जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत ते तेथुन निघुन गेले.


मला कमरेला उजव्या बाजुस व कानाला मार लागल्याने मी व माझा मेव्हुना अक्षय झेंडे याने मला व माझे वडील शिवाजी यांना घेवुन करमाळा पोलीस ठाणेस तक्रार देणेकरीता घेवुन आला आम्हाला प्रथम उपचाराची गरज असलेने उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील दवाखाना यादी दिली. त्यानंतर आम्ही उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे उपचार करुन परत करमाळा पोलीस ठाणेस १) गणेश दत्तात्रय नवले २) संदीप दत्तात्रय नवले ३) विमल दत्तात्रय नवले तिघे रा टाकळी ता करमाळा 4) महादेव नाना अंबोधरे रा भिलारवाडी ता.करमाळा जि सोलापुर यांचे विरुध्द तक्रार नोंदवली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!