खातगाव नं २ येथे पोलिसांचा दारू अड्ड्यावर छापा – दारुच्या बाटल्या व मुद्देमाल जप्त…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : खादगाव नंबर दोन तालुका करमाळा येथे पोलिसांनी छापा टाकून दारूच्या बाटल्या व इतर मध्यमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दारू विक्रेता याचे नाव विचारले असता दत्तात्रय उर्फ नाना अंबादास रणसिंग असे सांगितले आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्सटेबल ज्योतीराम अंगद बारकुंड यांनी फिर्याद दिली असून, त्यात त्यांनी म्हटले कि, आम्ही जिंती भागात पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, खातगाव नं. 2 (ता. करमाळा) येथील मोरया गॅरेजच्या बाजूला एक इसम चोरून दारूची विक्री करीत आहे.
अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने आम्ही तातडीने दोन इसमांना पंच म्हणुन बोलावुन घेवुन त्यांना हकीकत सांगुन ते पंच म्हणुन येणेस तयार झाल्याने आम्ही पोलीस निरीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाने सोबत पोहेकॉ.श्री.देवकर, पोना.श्री.गायकवाड, पोकॉ.श्री.खैरे असे सर्व खाजगी वाहनाने त्या ठिकाणी गेलो. तेथे काही अंतरावर वाहन उभे करून तेथुन पायी चालत मोरया गॅरेजच्या बाजूला गेलो असता पांढऱ्या रंगाची पिशवीतुन दारू विकत बसलेला एक व्यक्ती दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव दतात्रय उर्फ नाना अंबादास रणसिंग, वय 27 वर्ष रा. खातगाव नं. 2 ता. करमाळा असे असल्याचे सांगितले. त्याच्या जवळील ९१० रुपयांचे दारू बाटल्या व इतर मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.