कारखान्याची बदनामी करणे व बेछुट आरोप करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे : चेअरमन श्री.भांडवलकर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची साखर केंद्र सरकार व राज्याच्या नियमानुसार विक्री करून मागील आणि चालू वर्षाची देणी दिली आहेत, सदरची देणे देताना स्वतः कारखान्याने कर्ज कोणत्याही बँकेकडून न घेता ही सर्व देणे आदा केली आहेत, तसेच आरआरसी ची कारवाई महाराष्ट्रातील एफआरपी न दिलेल्या प्रत्येक कारखान्यावर सदरची कारवाई होत आहे. त्यामुळे कारखान्याची बदनामी करणे व बेछुट आरोप करून सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे थांबवावे असे आवाहन मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी केले आहे.
शेतकरी सभासदाला अडचणीत आणणे आणि मुद्दामुन कारखान्याची बदनामी करणे या करता बेछुट आरोप करून आता कर्ज प्रकरण मार्गी लागत असताना जाणीवपूर्वक बँकांचे आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी मात्र आम्ही अशा बेछुट आरोपांना आता अब्रू नुकसानीचा दावा दाखल करूनच उत्तर देणार असल्याचे मकाईचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी सांगितले आहे.





