कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ऊत्तरेश्वर मंदिरात शिवलिंगाची आकर्षक सजावट -

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ऊत्तरेश्वर मंदिरात शिवलिंगाची आकर्षक सजावट

0

केम(संजय जाधव):  केम येथील प्रसिद्ध देवस्थान श्री ऊत्तरेश्वर मंदिरात सोमवार तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने भगवान शंकराच्या शिवलिंगाची आकर्षक सजावट करण्यात आली.

या सजावटीची संकल्पना पुजारी भैय्या मोकाशी यांनी केली होती. सजावटीचे काम कृष्णा गुरव आणि तात्या गुरव यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले. विविध फुलांनी आणि विद्युत प्रकाशाने सजवलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

दर सोमवारी व सणवारा निमित्त ऊत्तरेश्वर मंदिरात शिवलिंगाचे वेगवेगळ्या रूपात सजावट करण्यात येत असते. या देखण्या सजावटीने मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!