श्री उत्तरेश्वर देवस्थानात भैरवनाथाची आकर्षक आरास

केम(संजय जाधव):सोमवार निमित्त केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानात भैरवनाथाची आकर्षक आरास करण्यात आली. या आरासमुळे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मनमोहक रूप पाहायला मिळाले.
ही आरास कृष्णा गुरव आणि तात्या गुरव यांनी साकारली. सजावटीतील बारकावे आणि पारंपरिक शैलीमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.
या मंदिरात दर सोमवारी तसेच सणानिमित्त शिवलिंगाची विविध रूपांत आरास केली जाते. त्याच परंपरेनुसार यावेळी भैरवनाथाची आरास करण्यात आली होती. ही आरास पाहून दर्शन घेताना मन प्रसन्न झाले – प्रकाश तळेकर,केम
