ऊत्तरेश्वर देवस्थानात त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दिपोत्सवाची आकर्षक सजावट

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत देवस्थान श्री ऊत्तरेश्वर मंदिरात त्रिपुरापौर्णिमेनिमित्त शिवलिंगाची आकर्षक दिपोत्सव सजावट करण्यात आली. मंदिर परिसर विद्युत रोषणाई व पारंपरिक दिव्यांनी उजळून निघाला होता.
ही सुंदर सजावट मंदिराचे पुजारी कृष्णा गुरव व तात्या गुरव यांनी साकारली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी भक्तिभावाने शिवलिंगाचे विविध रूपांत सजावट करून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मन मोहित केले.
त्रिपुरापौर्णिमेनिमित्त मंदिरात दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. दर्शन, आरती व पूजा-अर्चा यासाठी भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला.
“प्रत्येक सणावाराला मंदिराचे पुजारी सजावट करत असतात प्रत्येक वेळी केली जाणार सजावट ही अत्यंत देखणी असून ती पाहून आम्हा भाविकांचे मन प्रसन्न होते.” – रमेश तळेकर, भाविक, केम
