पाडव्यानिमीत्त उत्तरेश्वर देवस्थानात शिवलिंगाचे पानांच्या मखरातून आकर्षक सजावट

केम(संजय जाधव):करमाळा तालुक्यातील केम येथे असलेल्या जागृत श्री उत्तरेश्वर देवस्थानात दीपावली पाडव्याच्या निमित्ताने शिवलिंगाचे पानांच्या मखरातून पारंपरिक आणि आकर्षक सजावट करण्यात आली. पाडव्याच्या औचित्याने मंदिर परिसर भक्तिभावाने उजळून निघाला.
ही सजावट पुजारी भैय्या मोकाशी, कृष्णा गुरव आणि तात्या गुरव यांनी केली. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दरवर्षी विविध स्वरूपात शिवलिंगाची सजावट करण्याची परंपरा या मंदिरात असून यावर्षीचे पानांचे मखर विशेष आकर्षण ठरले.






