शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रवादीसोबत काम करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा – अतुल खूपसे-पाटील

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर जनशक्ती संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अतुल खूपसे-पाटील यांनी काल(दि.१३) मुंबई येथील वाय बी सेंटर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तर सिल्वर ओक येथे खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी पक्षा सोबत काम करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अतुल खूपसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काल सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे खा. शरद पवार यांच्याशी शेती, पाणी, पाऊस आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान खा. सुप्रिया सुळे आल्या असता त्यांनी सायंकाळी सिल्वर ओक वर भेट देण्यास सांगितले. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता खा. सुप्रिया सुळे यांच्याशी अतुल खूपसे पाटील व कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा झाली.

यावेळी विनिता बर्फ, रोहण नाईकनवरे, हर्षवर्धन पाटील, शर्मिला नलावडे, निखिल नागणे, भारती पाटसकर, विशाल पाटसकर, केशव लोखंडे यांच्यासह जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या देशाचा कृषिमंत्री कोण..? हे आजही राज्यासह देशातील ८५ टक्के जनतेला माहित नाही. मात्र कृषिमंत्री हा शब्द उच्चारताच जनतेच्या समोर आदराने शरद पवार यांचा चेहरा दिसतो. खा. शरद पवार यांनीच राज्यासह देशातील सर्वोच्च असलेली कर्जमाफी केली होती. यामध्ये लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला होता. यावेळी ना कोणत्या अटी होत्या ना कोणते नियम होते न कोणता ऑनलाईन चा तगादा होता. त्याच्यानंतर कोणतीच कर्जमाफी कोणत्याच सरकारने घेतली नाही. शरद पवार आजही बांधावर उतरून शेतकऱ्यांची आपुलकीने विचारपूस करतात. त्यामुळे

अतुल खूपसे-पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!