शहिद जवान नवनाथ गात स्मृती समितीकडून ५ पुरस्कार जाहीर – २ मार्चला पुरस्कार सोहळा

करमाळा(दि.२१): वरकुटे मु. (ता.करमाळा) येथील शहिद जवान नवनाथ गात यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थाना पुरस्कार दिले जात असतात. यंदा देखील २२ व्या स्मृती दिनानिमित्त येत्या २ मार्च रोजी ५ विविध पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.
यामध्ये खालीलप्रमाणे पुरस्कार स्मारक समितीचे अध्यक्ष नागनाथ गात व सचिव नीलकंठ ताकमोगे यांनी जाहिर केले आहेत.
- श्री. हनुमंत रामभाऊ कोकरे मुख्याधिकारी संगमनेर,(सामाजिक क्षेत्र)
- शहिद जवान मच्छिन्द्र वारे (मरणोत्तर – शौर्य).
- जि.प.प्राथ. शाळा पुजाहिरा वस्ती, वांगी नं.१, ता. करमाळा. (शैक्षणिक क्षेत्र).
- कु. जयहिंद नारायण जगताप. (धनुर्विद्या).
- हनुमंत रोकडे, फिसरे (कृषी)

सदरील पुरस्काराची वितरण 2 मार्च रोजी शहीद जवान नवनाथ गात यांच्या स्मृती दिनानिमित्त होणार आहे. यावेळी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 09:00 ते 11:00 या वेळेत ह.भ.प. गहिनीनाथ महाराज खेडकर यांचे कीर्तन होणार आहे.
हे पुरस्कार आमदार नारायणआबा पाटील यांच्या शुभ हस्ते दिले जाणार असून मा. श्रीमती शिल्पाताई ठोकडे (तहसीलदार, करमाळा), ऍड. बाबुराव हिरडे, पो.नि. मा. श्री. विनोद घुगे, मा. श्रीमती रश्मीदीदी बागल कोलते मा. श्री.रामदास झोळ,मनोज राऊत, गणेश करे-पाटील, अक्रूर शिंदे, अनिरुद्ध कांबळे, अजितदादा तळेकर, शेखरतात्या गाडे. ऍड रामराजे भोसले पाटील, देविदास ताकमोगे सर, महेश जाधव, सोमनाथआबा देवकते व आजी माजी सैनिक इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शहिद जवान नवनाथ गात यांच्या स्मृती दिनानिमित दिले जाणारे पुरस्कार व गुणवंतांचे सन्मान गेली २१ वर्षै पासुन हा उपक्रम चालु आहे. यावेळी २२ व्या स्मृती दिना निमित्त सामाजिक, शौर्य, शैक्षणिक, क्रिडा आणि कृषी क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/ संस्था यांना पुरस्कार, सन्मान केला जातो. त्यांनी केलेल्या कामाची पोच म्हणून आणि समाजाप्रती, देशाप्रती काम करत असताना मनोबल वाढावे, तसेच आणखी उत्साहाने काम करता यावे याकरीता सन्मान केला जातो.





