रमेश भिसे यांना सावित्री–फातिमा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

केम(संजय जाधव): शिक्षक भारती संघटनेच्या वतीने दिला जाणारा सावित्री–फातिमा आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, केम (ता. करमाळा) येथील शिक्षक रमेश किसन भिसे यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणारे सेवक, लिपिक, अधीक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक व क्रीडा शिक्षक यांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. त्यानुसार रमेश किसन भिसे यांना आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा पुरस्कार शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया रामदास झोळ, सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के, शिक्षण अधिकारी कादर शेख, प्रशासन अधिकारी मल्हारी माने, तसेच संघटनेचे पदाधिकारी सुजितकुमार काटमोरे, विकास दासाडे, नवनाथ गेंड व विजयकुमार गुंड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक जगताप, तसेच वाघमोडे, उघडे, यादव, साळुंखे आदी शिक्षक उपस्थित होते.

