सोलापूर सोनार समाज संघटनेकडून अंकिता वेदपाठक यांना पुरस्कार प्रदान
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : सोलापूर येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर संलग्न वसुंधरा महिला मंडळाने जागतिक महिला दिनाचे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १० मार्च रोजी सोलापूर येथे समाजातील कर्तुत्वान महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यामध्ये करमाळा तालुक्यातील जेऊर येथील अंकिता विष्णू वेदपाठक यांना शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अंकिता वेदपाठक या जेऊर येथील जिनिअस प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या संचालिका असून त्यांनी आपल्या क्लास मार्फत अनेक विद्यार्थ्यांना अबॅकस परीक्षेत नॅशनल स्पर्धेत यश मिळवून दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना सदर कार्यक्रमात सोलापूर येथील सौ शिल्पा ओसवाल तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर व डॉक्टर सारिका देगावकर स्त्री रोग तज्ञ सोलापूर यांच्या हस्ते सन्मानपत्र व विशेष स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले.