भाजी मंडईतील स्वच्छतागृहाची दुरवस्था- मुख्याधिकाऱ्यांना भाजी विक्रेत्यांचे निवेदन - Saptahik Sandesh

भाजी मंडईतील स्वच्छतागृहाची दुरवस्था- मुख्याधिकाऱ्यांना भाजी विक्रेत्यांचे निवेदन

संग्रहित छायाचित्र

करमाळा (दि.७) – करमाळा शहरातील सध्याची गावातील भाजी मंडई मधील पुरुषांच्या  स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. भाजी मंडई मध्ये काम करणाऱ्या भाजी विक्रेत्यांना व व्यासायिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात  करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना याबाबत निवेदन दिलेले आहे. या निवेदनावर भाजी मंडई मधील भाजी विक्रेत्यांच्या   व व्यावसायिकांच्या सह्या आहेत.

करमाळा येथील नवी भाजी मंडई चे बांधकाम पूर्ण झाले असले तरी नवी भाजी मंडई कधी सुरू होणार याबाबत अद्याप नगर पालिकेने स्पष्ट केलेले नाही. नवीन बांधलेल्या भाजी मंडईमध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. नवी भाजी मंडई लवकरात लवकर सुरू करून तेथे देखील स्वच्छतागृहाची चांगली सोय नगरपालिकेने करावी, अशी मागणी भाजी विक्रेत्यांची आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहे ही अत्यंत अत्यावश्यक गोष्ट असताना देखील नगरपालिकेकडून स्वच्छतागृहाबाबत नेहमीच दुर्लक्ष केले केले जाते. करमाळा शहरातील आहे ती स्वच्छतागृहे सुद्धा वापरण्यायोग्य नसतात यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांना नेहमीच याची समस्या जाणवत असते मुख्याधिकारी यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!