मकाई कारखान्यावर बागल गटाची एकहाती सत्ता – मोठ्या मताधिक्याने उमेदवार विजयी…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्व उमेदवार मोठ्या फरकाच्या मताधिक्याने निवडून आले आहेत सत्ताधारी बागल गटाच्या उमेदवारास आठ हजारांच्या आसपास तर विरोधकांना दीड हजाराच्या आसपास मत मिळाले आहेत, या निवडणुकीत बागल गटाचे प्रमुख नेते प्रचारात नसतानाही व त्यांची उमेदवारी नसतानाही कार्यकर्त्यांच्या जीवावर मकाई कारखान्यावर पुन्हा एकदा एखादी सत्ता मिळवली आहे.
मिळालेले मते… # भिलारवाडी – सुनिता गिरंजे – 1328, आप्पा जाधव – 1249, अजित झांझुर्णे – 8267, रामचंद्र हाके – 8129 # पारेवाडी – गणेश चौधरी – 1546, रेवन्नाथ निकत – 8390, संतोष पाटील – 8383, बाळासाहेब पांढरे – 8094 # मांगी – दिनेश भांडवलकर- 8256, अमोल यादव – 8166, सुभाष शिंदे – 1465
महिला राखीव गट : कोमल करगळ – 8271 सुनिता गिरंजे – 1435 अश्विनी झोळ – 8232, अविरोध गटनिहाय उमेदवार : चिखलठाण – सतीश नीळ, दिनकर सरडे, वांगी- सचिन पिसाळ, युवराज रोकडे, उस उत्पादक व बिगर उस उत्पादक, पणन संस्था प्रतिनिधी – नवनाथ बागल भटक्या जाती जमाती – बापु चोरमले, इतर मागास – अनिल अनारसे, अनुसूचित जाती जमाती : अशिष गायकवाड.
मकाई सहकारी साखर कारखाना माजी राज्यमंत्री स्व.दिगंबरराव बागल यांनी स्थापन केलेला आहे, या कारखान्यावर सुरुवातीपासूनच बागल गटाची येथे एकहाती सत्ता आहे, या निवडणुकीत पहिल्यांदाच १७ जागांसाठी तब्बल ७५ अर्ज दाखल झाले होते. मात्र त्यातील बागल विरोधी गटाचे फक्त पाच अर्ज पात्र ठरले होते. सहकारी संस्था मतदारसंघात नवनाथ बागल यांचा एकच अर्ज आल्याने ते सुरुवातीलाच बिनविरोध झाले होते. या निवडणुकीत बागल गटाचे प्रमुख नेते रश्मी बागल व दिग्विजय बागल हे प्रचारात नसतानाही व त्यांची उमेदवारी नसतानाही केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर मकाई कारखान्यावर पुन्हा एकदा एखादी सत्ता मिळवली आहे. या निकालानंतर बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी बागल संपर्क कार्यालयात मोठा जल्लोष केला आहे.