थकित ऊस बिलासाठी बहुजन संघर्ष सेनेने केले कुंभेज फाटा येथे चक्का जाम आंदोलन.. - Saptahik Sandesh

थकित ऊस बिलासाठी बहुजन संघर्ष सेनेने केले कुंभेज फाटा येथे चक्का जाम आंदोलन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : थकित ऊसाची बिले मिळावीत म्हणून करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी-करमाळा महामार्गावरील कुंभेज फाटा येथे चक्का जाम आंदोलन केले.

याप्रसंगी या आंदोलनात दत्तू आबा गव्हाणे, भिमा घाडगे, सोमा घाडगे, कल्याण कोठावळे, विठ्ठल आप्पा शिंदे माजी संचालक आजीनाथ कारखाना, विष्णू रंदवे ,रवींद्र घोडके सरपंच आळजापूर, मच्छिंद्र गायकवाड, बिबीशन गव्हाणे उप सरपंच पोफळज, राजेंद्र पवार चेअरमन पोफळज , बलभीम गव्हाणे मा.उप सरपंच पोफळज, भाऊसाहेब हजारे, लहु भालेराव सरपंच कामोणे, आंगद लांडगे सरपंच पुनवर, श्रीरंग लांडगे,आवीनाश मोरे सरपंच खामगाव, संदीप मारकड पाटील सरपंच उमरड, निलेश पडवळे,समाधान बदे, ईरफान शेख,राहुल बदे,बालाजी मारकड, श्रीकांत मारकड, आप्पा भोसले, कालिदास कंबळे,म्हामुद शेख, दादासाहेब धेंडे, राहुल बदे, रामा पांडव, महादेव कडाळे, कालिदास लुचारे, हनुमंत खरात, राहुल खरात, सचीन चितारे, सुनील गरड,रूशी शिंदे,प्रवीण कांबळे, विकास कदम, लखन कदम,भीमराज कदम, लक्ष्मण कदम आदी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी या आंदोलनात सभापती गहीनीनाथ ननवरे,सचिन काळे मराठा सेवा संघ, राजकुमार देशमुख राष्ट्रवादी, प्र.नंदकिशोर वलटे यांची भाषणे झाली.

या रस्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी आपल्या भाषणातुन बोलताना सांगितले कि, मकाई, भैरवनाथ विहाळ, कमलाई पांडे, कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील घागरगाव, साई कृपा हिरडगाव वईतर कारखान्याने शेतकऱ्यांची बिले नोव्हेंबर महिन्यापासून थकवीली आहेत त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, जर एकाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर सबंधित साखर कारखान्याच्या चेअरमन वरती मनुष्यवधाचे गुन्हे शासनाने दाखल करावेत. बबन दादा विठ्ठलराव शिंदे साखरकारखाना माढा चे पेमेंट वेळेवर करतात दर ही चांगला देतात मग करमाळा तालुक्यातील कमलाई साखर कारखाना पांडे याचे ऊस बिल वेळेत का देत नाही? तसेच मकाई साखर कारखान्याची नोव्हेंबर महिन्यापासून पासुन ऊस बिले व वाहतूक बिले थकली आहेत शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली तरी वरिष्ठ मंडळी झोपेतून जागे होईनात, कृषी प्रदर्शनावरती तुम्ही कोट्यावधी रूपये खर्च केले, मात्र शेतकऱ्यांची ऊसाची बिले दिली नाहीत,
या सर्व साखरसम्राटांना इशारा देतो 30 एप्रील पर्यंत शेतकऱ्यांची ऊस बिले द्या, जर 30 एप्रिलपर्यंत ऊस बिले दिली नाहीत तर सबंधित कारखान्यांच्या चेअरमन च्या बंगल्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आसाही इशारा राजाभाऊ कदम यांनी दिला.

याप्रसंगी सदरचे निवेदन नायब तहसीलदार सुभाष बदे,मंडल अधिकारी काजी यांनी स्वीकारले, याप्रसंगी करमाळा पोलिसांनी विशेषतः सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री माहुरकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!