गटविकास अधिकाऱ्यांच्या अंगावर शाई टाकल्याप्रकरणातील आरोपींचा जामीन नाकारला..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्या अंगावर शाई टाकण्याचा प्रयत्न झाला केल्या प्रकरणातील संशयीत आरोपींची आज (ता.२४) अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली, याप्रकरणी यावेळी कोर्टाने सदर अटकपूर्व जामीन नाकारला आहे. यामध्ये २५ एप्रिल रोजी शाई टाकल्याप्रकरणी जेऊर येथील तीघांवर गुन्हा दाखल आहे.
जेऊर ग्रामपंचायतीमधील गैरकारभार झाल्याचा आरोप करत बालाजी गावडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, दरम्यान प्रभारी गटविकास अधिकारी भोंग हे गटविकास अधिकारी कक्षाच्या बाजूला त्यांच्या दालनात अंदोलकांशी चर्चा करत होते. चर्चा सुरु असतानाच अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर तेथून आंदोलनकर्त्यांने पळ काढला. त्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शासकीय कामकाज अडथळा केल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये गावडे, करचे व एक अनोळखी इसम असे तिघं होते. तेव्हापासून ते तिघेही फरार आहेत. यासंदर्भात त्यांनी अटकपूर्व जामीन्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर जामीन्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. सरकारी वकील म्हणून ॲड प्रदीप बोचरे, फिर्यादीकडुन यांच्याकडून ॲड निखील पाटील तर तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी जगदाळे हे काम पाहत आहेत.