'बकरी ईद'ची नमाज पठण मौलालीमाळ येथील ईदगाह मैदानावर होणार : कलीम काझी -

‘बकरी ईद’ची नमाज पठण मौलालीमाळ येथील ईदगाह मैदानावर होणार : कलीम काझी

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : बकरी ईद (ईद उल अजहा) ची नमाजपठण करमाळा शहरातील मौलालीमाळ येथील ईदगाह मैदानावर ठीक सकाळी 08:15 वाजता होईल,अशी माहिती करमाळा शहरातील शहर काझी हाजी कलीम काझी सर यांनी दिली असुन, शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


तसेच समाज बांधवांनी ईद ची नमाजपठण झाल्यानंतर शांतता मय वातावरणात कुर्बानी करावी व कुर्बानी केल्यानंतर कोणतेही चित्र किंवा व्हिडिओ चित्रीकरण न करता सोशल मीडिया वर प्रसारित करु नये. तसेच कुर्बानी केल्यानंतर परिसरात घाण न करता आपला परिसर स्वच्छ ठेवा व शासनाने दिलेल्या अटी व शर्ती चे नियम पाळुन प्रशासनास सहकार्य करावे व मोठ्या भक्तिभावाने ईद चा सण साजरा करावा असे आवाहन सर्व मुस्लीम समाज बांधवांना केले आहे.


यावेळी समीर भाई शेख, आझाद भाई शेख, जमीर भाई सय्यद , रमजान भाई बेग, सुरज भाई शेख, जहांगीर भाई बेग, दिशान भाई कबीर, मुसतकीम भाई पठाण , इकबाल भाई शेख, इमित्याज भाई पठाण, आलिम भाई खान, अरबाज भाई बेग, शाहीद भाई बेग कलीम भाई शेख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!