कंदर येथे बाल आनंद बाजार उत्साहात साजरा

कंदर(संदीप कांबळे) : कंदर ता.करमाळा येथील श्री शंकरराव भांगे प्राथमिक विद्या मंदिर प्रशालेत शनिवारी (दि. १०) बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या बाजाराचे उद्घाटन आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नवनाथ भांगे व लोकनियुक्त सरपंच मौला मुलाणी यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी विलास माने रामचंद्र भगत भाऊ शिंदे मनोहर सरडे बापू कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांना भाजीपाला मिठाई वडापाव आईस्क्रीम आदी चे स्टॉल लावले होते.या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळावे हा त्यामागील उद्देश होता.या बाल आनंद बाजारात सुमारे एक लाख रुपये ची आर्थिक उलाढाल झाली असल्याचे प्रशालेचे संस्थापक सचिव सुनील भांगे यांनी सांगितले.बाजार यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक सौ.उबाळे व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.




