मांगी येथील जिल्हा परिषद शाळेतर्फे बाल दिंडीचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : 15 जुलै रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी येथे बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते दिंडीत विद्यार्थ्यांनी साक्षरते विषयी जनजागृती केली .बालदिंडीत शाळेतील शिक्षण, विद्यार्थी, माता पालक व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यावेळी चिमुकल्यांनी साक्षरते विषय जनजागृती केली.
या दिंडीसाठी चिमुकल्यांनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते चिमुकल्या मुलींनी पारंपरिक साड्या घालून डोक्यावरती तुळशी वृंदावन व हातात श्री विठ्ठलाची मूर्ती होती त्याचप्रमाणे मुलांनी पारंपरिक पोशाखामध्ये हातामध्ये टाळ आणि पताका घेत विठ्ठल नामाचा गजर केला .
यावेळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वृंद मुख्याध्यापक श्री काैले सर उपशिक्षिका श्रीमती वैशाली पवार मॅडम ,श्रीमती सुवर्णा महामुनी मॅडम ,श्रीमती आशा देमुंडे मॅडम, अंगणवाडीच्या संचेती मॅडम बागल मॅडम, सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल, यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.


