आषाढी एकादशीनिमित्त उपळवटे शाळेत काढण्यात आली बालदिंडी
उपळवटे (संदीप घोरपडे) – उपळवटे (ता.माढा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी आषाढी वारी निमित्ताने बाल दिंडी काढण्यात आली, याप्रसंगी विठ्ठलाच्या वेशभूषेत आदर्श धनाजी गायकवाड,तर रुक्मिणीच्या वेशभूषेत अनुष्का दत्ता गाडे हे विद्यार्थी होते तर इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत होते.
या सर्व विद्यार्थ्यांची रूपे या बालदिंडीतून बघायला मिळाली, आषाढीवारी निमित्त हरिनामाच्या गजरात ह्या बालदिंडी चे जिल्हा परिषद शाळेतून प्रस्थान झाले व उपळवटे गावातून ही बालदिंडी गावातील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सांगता झाली, या बालदिंडीमध्ये विद्यार्थ्यासह गावकऱ्यांनी देखील सहभाग घेतला होता,
यावेळी उपस्थित उपळवटे गावचे विद्यमान सरपंच विशाल खूपसे, उपळवटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मोरे, ज्योतीराम तळेकर, ठकसेन लवटे,प्रदीप बगाडे,भारत घोरपडे,मंदाताई खोसे, अंजना लोंढे, शोभा ढगे, रेश्मा घाडगे, सुनंदा मुरूमकर, चांदन भिसे, रतन घोरपडे, आदी मान्यवर उपस्थित होते.