करमाळ्यात ‘गुरुकुल पब्लिक स्कूल’ची आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये नर्सरी ते दहावीचे 1 हजार 175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी गुरुकुलचे बाल रिंगण व पांडुरंगाची गाणी सादर करण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये प्रशालेच्या प्रांगणात विठ्ठल देवाची भूमिका कार्तिक खंडागळे, रुक्मिणी देवीची भूमिका सानिका लावंड व शहा, तसेच संत ज्ञानेश्वर अमरनाथ चिवटे, संत तूकाराम तरेश थोरात, कीर्तनकार अवधूत पवार, तबलावादक अथर्व मोरे, हरिपाठ युद्ध वीर नलवडे, अभंग स्वराली जाधव, मेघराज शिंदे, गवळण समृद्धी राखुंडे, सृष्टी जाधव, संस्कार हजारे व गुरुकुलचे शिक्षक जमदाडे आदि जणांनी व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.

याप्रसंगी टाळकरी, झेंडेकरी सेवेकरी, वारकरी, तुळशी घेऊन फुगडी खेळताना मुली व महिला पालक, तसेच बाल वारकरी या सर्वांनी वाखरीच्या रिंगणाप्रमाणे गुरुकुल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात रिंगण सोहळा सादर केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भांडवलकर यांनी केले. शिंदे, पवार, ओहोळ, दास व सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी आभार साबळे यांनी मानले. गुरुकुल पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नितीन भोगे यांनी सर्व पालकांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!