‘बंधन’ बँकेतील निलंबीत मॅनेजर राहुल मुंडे यांना जामीन मंजूर – पावणेदोन वर्षांनंतर सुटका…

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.७ : करमाळा येथील ‘बंधन’ बँकेतील निलंबीत मॅनेजर राहुल मुंडे यांनी सव्वा दोन कोटी रूपयांची अफरातफर केली होती. त्याप्रकरणी पोलीसांनी फेब्रुवारी 2022 मध्ये त्यास अटक केली होती. त्यानंतर श्री.मुंडे यास तब्बल पावणेदोन वर्षांनंतर जामीन मंजूर झाला आहे.
यात हकीकत अशी, की करमाळा शाखेत राहुल मुंडे हा शाखाधिकारी म्हणून कार्यरत असताना ,त्याने काही ग्राहकाशी संपर्क साधून व संगणमत करून दोन कोटी 11 लाख रूपयांची अफरातफर केली होती. यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरवातीला श्री.मुंडे फरार होता. फेब्रुवारी 2022 मध्ये पोलीसांकडून त्याला अटक झाली होती.
त्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला नव्हता, पुढे करमाळा न्यायालयात त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले.त्यानंतरही त्यास जामीन मंजूर झाला नाही. त्यानंतर बार्शी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयापर्यंत जामिनासाठी प्रयत्न केले पण जामीन मंजूर झाला नाही.त्यानंतर श्री.मुंडे याच्यावर दोष निश्चित करण्यात आला. त्यानंतर चौकशीचे काम सुरू झालेपण विहीत मुदतीत सदर खटल्यातील कामकाज निष्कर्षाप्रत आले नाही.
त्यानंतर श्री.मुंडे यांचे वकील ॲड कमलाकर वीर यांनी कायद्यातील तरतुदीनुसार न्यायाधीश भार्गवी भोसले यांच्यासमोर जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या युक्तिवादामध्ये ॲड. वीर यांनी उच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्याचे संदर्भ दिले. त्यानंतर न्यायाधीश भोसले यांनी श्री.मुंडे यास 50 हजार रुपये रक्कमेचा जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर श्री.मुंडे यांची जामीनावर मुक्तता झाली आहे.यात मुंडेच्यावतीने ॲड.अक्षय वीर,ॲड विश्वजीत बागल यांनी तर शासकीय अभियोक्ता म्हणून ॲड सचिन लुणावत यांनी काम पाहिले.

