मांगी गावचे सुपुत्र पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांचा बँकॉक म्युझिक शो
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार प्रवीणकुमार यांचा २० नोव्हेंबर रोजी थायलंड देशाची राजधानी असलेल्या बँकॉक शहरात म्युझीक शो च्या निमित्ताने दौरा होणार आहे.
आपल्या गायन कलेच्या जोरावरती प्रवीणकुमार यांनी देश विदेशामध्ये हजारो कार्यक्रम केलेले असून त्यांनी आत्तापर्यंत दोन मराठी चित्रपटात पार्श्वगायन केलेले आहे, तसेच अनेक अल्बम मध्ये स्वतःचा आवाज दिलेला असून त्यांनी स्वतः गाणी लिहून संगीतबद्ध पण केलेले आहे.
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात बँड क्षेत्रातून आपल्या गायनाची सुरुवात करत पुणे, मुंबईच्या नामवंत जगप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा मध्ये स्टेज शो करत तालुकासह जिल्ह्याचे नाव देश-विदेशामध्ये गाजवलेले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज पार्श्वगायक व गायिका सोबत त्यांनी स्टेज शो केलेले आहेत, घरातूनच भजन सम्राट राजेंद्र अवचर व कै .सुहासकुमार अवचर यांचे सोबत शास्त्रीय गायनाचे धडे मिळवलेले प्रवीणकुमार यांच्या गायनाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
त्यांचे बँकॉक दौऱ्यासाठी करमाळा तालुक्यातील अनेक राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक ,वैद्यकीय, व्यापारी तसेच प्रेस संघ व पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेंच कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांचे या दौऱ्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे मांगी गावाचे नाव साता समुद्रा पार गाजवणाऱ्या प्रवीणकुमार यांना मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते सुजीत बागल, युवा नेते दिग्विजय बागल, रश्मी बागल, पुणे येथील उद्योजक अशोकशेठ नरसाळे, येथील ज्येष्ठ संभाजीराजे बागल, गुलाबराव बागल यांनी विशेष शुभेच्छा दिलेल्या आहेत.