निराधारांचा आधार... -

निराधारांचा आधार…

0




> “संघर्षातून उमललेलं जीवन,
सेवा हीच ज्यांची साधना,
भटक्या-विमुक्तांचा उद्धार,
हिच जिवनाची कामना …”



आज आपल्या यशाचा आलेख पाहताना, आपला जीवनप्रवास डोळ्यांसमोर उभा राहतो. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरवले… ज्यांच्या आधाराने घडायचं, ज्यांच्या हाताला धरून चालायचं तेच हात नशिबाने हिरावून घेतले. पण आजोबांच्या काठीचा आधार घेऊन आपण मोठे झालात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य, जिद्द आणि संयम यांच्या बळावर आपण आयुष्य उभं केलं.



करमाळ्यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आपण शिक्षण घेतलं. त्यावेळी सन १९८३ साली मी वरिष्ठ महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आलो आणि  आपण कनिष्ठ महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी झालात. त्यावेळी आपल्या दोघांची करमाळा शहरातून   उघड्या जीपमधून काढलेली  मिरवणूक आजही संस्मरणीय आहे.  हा अपवादात्मक  सुखाचा क्षण सोडला, तर  सातत्याने आर्थिक अडचणी, नोकरी, घर, लग्न  हे प्रश्न होतेच.पण आपल्या ईच्छेला मुर्तस्वरूप लाभले.


आपल्या आयुष्याला योग्य जोडीदार मिळाला. सौ. स्वातीताई बरोबर सन 1993 ला विवाह झाला.दोघांनी मिळून जीवनाचा प्रवास गतीमान सुरू केला. सुरवातीला आदिनाथ मध्ये सिक्युरिटीजचे काम सुरू केले पण लवकरच ते सोडले. जगण्याला आधार म्हणून, घरी छोटे दुकान सुरू केले,  महात्मा फुले संस्थेत समाजकाम सुरू केले. पुढे नगरपरिषदेचे नगरसेवक पद मिळाले. अशाच समाजकारणावाटचालीतून  “भटक्या विमुक्त जाती जमाती आदिवासी ज्ञानपीठ” या संस्थेचा जन्म झाला. एकलव्य निवासी आश्रम शाळा सुरू झाली.


त्यात भिल्ल, आदिवासी, पारधी, निराश्रीत मुलांच भवितव्य घडवण्याचे काम सन 1999  पासून  सुरू आहे. लहानपणी तुम्हाला जे सुख मिळालं नाही — नवे कपडे, सहली, रुचकर जेवण… ते आज तुम्ही या मुलांना भरभरून देत आहात. आणि याच मुलांमधून घडत आहेत उद्याचे अधिकारी, उद्योजक आणि समाजसेवक.

आपल्या या प्रवासात सोबत होती व आहे, ॲड. सुधाकर वांगडे, व्यापारी नितीन दोशी, ठेकेदार किशोर भगत, कै. कल्याणराव गायकवाड, कै. कमलेश देवी, कै. विजय खुटाळे यांसारख्या जिवलग मित्रांची. याशिवाय स्वातीताईंची साथ आहेच  पण  मुलगा ॲड. संग्राम व कन्या क्रांती (एम.एस्सी. ॲग्री) यांनीही आपल्या पावलावर पाऊल ठेवून मिळवलेलं यश ही आपली खरी ओळख ठरली आहे.



संस्थापक म्हणून, पालक म्हणून, समाजसेवक म्हणून — आपलं जीवन खरंच एक आदर्शात्मक आहे. आपल्या कार्याचा प्रवाह यापुढेही अखंड, अविरत वहात राहो हीच प्रार्थना. खरंतर आपण आपले आत्मचरित्र लिहणं ही काळाची गरज आहे.

खरं तर  “तुमचं आयुष्य आसचं फुलत राहो,
आरोग्य, समाधान, आनंद लाभो.
सेवाभावी कार्याचा वारसा पुढे चालू राहो,
आणि समाजाच्या मनातलं स्थान अधिकाधिक वृद्धिंगत होवो.”
आदरणीय रामकृष्ण माने (भाऊ), आपणास वाढदिवसानिमित्त आरोग्यमय, समाधानदायी , सेवाभावी ,मंगलमय शुभेच्छा! 🎂🌹
डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे, करमाळा.मो.न 9011355389

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!