जुन्या भांडणाचा रोष मनात ठेवून महिलेस मारहाण... - Saptahik Sandesh

जुन्या भांडणाचा रोष मनात ठेवून महिलेस मारहाण…

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : घरासोमरील बोअरचे पाणी देण्यास विरोध केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा रोष मनात ठेवून दाम्पत्याने महिलेस मारहाण केली आहे. हा प्रकार वांगी नं. २ येथे २३ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता घडला आहे.

यात स्वाती रविंद्र क्षीरसागर (रा.वांगी नं.२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की २२ फेब्रुवारीला माझे पतीने घरासमोरील बोअरमधील बंद पडलेली मोटार दुरुस्त करून आणली व ती चालू केली. त्यावेळी माझे दीर शिवकुमार क्षीरसागर म्हणाले, की मला बोअरचे पाणी पाहिजे. त्यावेळी माझे पतीने शेतात केलेल्या खर्चाची मागणी केली. त्याचा राग आला व माझे दीर भांडण करून गेले.

त्यानंतर २३ फेब्रुवारीला सकाळी सात वाजता मी दारात झाडत असताना माझे दीर शिवकुमार हे मला शिवीगाळ करू लागले. त्यांना शिव्या देऊ नका.. असे म्हणाले असता त्यांनी चाकूने माझ्या डोक्यात मारले तसेच खाली पडलेला गज घेऊन माझ्या डोक्यात मारला. तसेच माझी जावू अस्मिता हिने बॅटने माझ्या पाठीत मारले. त्यानंतर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आले. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहुरकर हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!