ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून कोयत्याने मारहाण..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून दांम्पत्यास एकाने कोयत्याने व खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली आहे. हा प्रकार ६ डिसेंबरला सायंकाळी सव्वापाच भगतवाडी (ता. करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी मारूती अंकुश गिरंजे (रा. भगतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की ६ डिसेंबरला सायंकाळी शेतात गेलो असता माझी पत्नी सीमा गायीचे दुध काढत असताना माझा चुलतभाऊ सचिन संदिपान गिरंजे हा ओरडत व शिव्या देत आला व ग्रामपंचायतीत मतदान का केले नाही म्हणून त्याने माझ्या पत्नीच्या हाताच्या पोटरीवर कोयत्याने मारले. मी सोडविणस गेलो असता त्याने माझ्या हातावर खोऱ्याचा दांडा फेकून मारला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.