शेतातील रस्त्यावरून का जातो म्हणून लाकडी काठीने मारहाण.. -

शेतातील रस्त्यावरून का जातो म्हणून लाकडी काठीने मारहाण..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : आमच्या शेतातील रस्त्यावरून तु का जातो असे म्हणून दोघाजणांनी प्रौढास काठीने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार ५ एप्रिलला पहाटे सव्वापाच वाजता पाथुर्डी, ता.करमाळा येथे घडला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात धनाजी सोमनाथ वाघे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ५ एप्रिलला पहाटे सव्वापाच वाजता मी आमच्या शेतातील पिकाला पाणी देत असताना गावातील चांगदेव फकीरा वागे व तात्या पांडूरंग वाघे हे आले व तु आमच्या जमिनीतून असलेल्या रस्त्याने का जातो असे म्हणून लाथाबुक्यांनी व काठीने बेदम मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!