आषाढी एकादशी पूर्वी नगरपरिषदेने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून साफसफाई करण्याची मागणी - Saptahik Sandesh

आषाढी एकादशी पूर्वी नगरपरिषदेने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून साफसफाई करण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र


करमाळा (संदेश प्रतिनिधी) – आषाढी एकादशी पूर्वी करमाळा नगरपरिषदेने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवून साफसफाई करण्याची मागणी नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका बानू जमादार यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आषाढी एकादशी साठी महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूर येथे जात असतात या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत विशेषता श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही रावगाव रोड ते किल्ला वेस या मार्गावरून करमाळा शहरात येत असते. सदर पालखीत अंदाजे 35 ते 40 हजार वारकरी असतात या भागातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहे तसेच प्रत्येक ठिकाणी कचरा पडलेला असलेले दिसत आहे व काही ठिकाणी वेड्या बाभळीचे झाडे आलेले आहेत.

करमाळा : संग्रहित छायाचित्र

तसेच शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी नगरपरिषद जंतुनाशक पावडरची फवारणी करते व फिनेलचेही फवारणी केली जाते परंतु पंढरपूरला जाण्या करिता वारकरी चे आगमन करमाळा शहरात सुरू झालेले आहे परंतु पालिकेचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे तरी नगर परिषदेने शहरातील सर्व खड्डे व साफसफाई तसेच जंतुनाशक औषधाची फवारणी लवकरात लवकर करावी अशी मागणी करमाळा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका बानू जमादार यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!