भांगे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे..
कंदर (ता.करमाळा) येथील श्री शंकरराव भांगे मालक प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन शंकरराव भांगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी माजी प्राचार्य जयप्रकाश बिले विलास माने अतुल पाटील जयंत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री गणेश च्या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये जुनियर केजी ते इयत्ता सहावी पर्यंतच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्यविष्कार करत उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.
या कार्यक्रमात कलाकार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीता बरोबर हिंदी मराठी चित्रपटातील गीते रिमिक्स कोळी गीते लावणी आदिवासी शेतकरी गीत धार्मिक गीतावर आपला नृत्यविष्कार सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिनी नवले सुनिता लांडगे यांनी केले तर उपस्थितांचे स्वागतचे प्रशालेचे सचिव सुनील भांगे यांनी केले. तर आभारप्रदर्शन रेश्मा उबाळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकाबरोबर शिक्षिकेतर कर्मचारी यांनी कष्ट घेतले.



