सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार – भरत अवताडे

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – राजकीय पदाधिकारी म्हणून काम करत असताना देखील विविध पक्षातील मित्र मंडळींना बरोबर घेऊन समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर असेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते भरत अवताडे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सत्कार करण्यात आला.

यावेळी सुभाष अण्णा सावंत गटाचे नेते श्री सुनील बापू सावंत,युवा नेते मानसिंगराव खंडागळे,उद्योगपती दिनेश घोलप, अशोक नरसाळे,पत्रकार नासिर कबीर,नागेश चेंडगे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील
जेऊर शहर प्रमुख बाळासाहेब करचे,युवा सेना जिऊर शहर प्रमुख महादेव सूर्यवंशी,रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. अवताडे म्हणाले की, माझे सर्व गटातटात मित्र असून राजकारण वेगळे व मैत्री वेगळी ठेवली पाहिजे.

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात प्रचंड समाजसेवेची जाळ उभे राहिले आहे याचा मला अभिमान आहे.

यावेळी उपस्थितांनी श्री. अवताडे यांच्या कार्याचे कौतुक आपल्या भाषणातून व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!