गांधी विद्यालयातील नवीन खोली बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

करमाळा (दि.१६ ) – करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयात काल दि .१५ ऑक्टोबर रोजी संस्थेचे विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य बी .के .पाटील , संबंधित ठेकेदार दगडू थोरात, उपप्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक रमेश भोसले पर्यवेक्षिका सुनिता नवले, सर्व सहशिक्षक – सहशिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी आमदार व संस्थाध्यक्ष जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त शंभूराजे जगताप यांनी या कामाबाबत पाठपुरावा करून मंजूरी मिळवली होती. या वर्गखोल्यांसाठी २० लाख रुपये निधी मंजूर आहे. विधानसभा निवडणुक आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर या कामाचे भूमीपूजन करण्यात आले असून लवकरच संबधित ठेकेदाराकडून बांधकामास प्रत्यक्ष सुरुवात होईल. या वर्गखोल्यांमुळे महात्मा गांधी शैक्षणिक संकुलाच्या वैभवात निश्चीतपणे भर पडून सर्व सामान्य विद्यार्थ्यांची सोय होणार आहे .





