शेलगाव (क) येथे आमदार शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

करमाळा (दि.५) – करमाळा तालुक्यातील शेलगाव (क) येथे आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. यामध्ये एकूण तीन कोटी ५७ लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर तीन कोटी सत्तावीस लाख रुपयेच्या खर्चाच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा देखील यावेळी करण्यात आले.

विविध विकास कामे व त्यांचा मंजूर निधी पुढीलप्रमाणे –
- पांडे- शेलगाव – घोटी- केम रस्ता प्रजिमा 10 ( पांडे – शेलगाव क – साडे ) सुधारणा करणे – 2 कोटी ,
- जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणे – 80 लाख,
- नाना दुकानदार ते काटूळे आबा वाडा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे- 5 लक्ष ,
- उद्धव शिंदे वस्ती ते विकास वीर वस्ती रस्ता मुरमीकरण करणे- 3 लक्ष,
- खरपा वस्ती, माळी वस्ती नं 1 व मारुती मंदिर येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 हायमास दिवे बसविणे- 4.50 लक्ष
- शेलगाव क – गुळसडी ग्रामीण मार्ग सुधारणा करणे – 20 लक्ष ,
- जि प प्रा शाळा शेलगाव क – 1 नवीन वर्गखोली बांधणे – 9 लक्ष,
- 25 /15 योजनेअंतर्गत वीर वस्ती नं.1 ओढ्यावर पूल बांधणे व खडीकरण करणे -10 लक्ष,
- आमदार स्थानिक विकास निधी मधून माळी वस्ती नंबर 2 येथे तालीम बांधणे – 7 लक्ष ,
- जिल्हा नियोजन मंडळ मधून स्मशानभूमी शेड व वॉल कंपाऊंड बांधणे – 3.50 लक्ष,
- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडून जिम ( व्यायाम साहित्य ) 5 लक्ष,
- समाज कल्याण विभाग अंतर्गत बनसोडे समाज मंदिर समोर बौद्ध विहार बांधणे -10 लक्ष रुपये
- अशा तीन कोटी सत्तावीस लाख रुपयेच्या खर्चाच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला
- मिरगव्हाण – अर्जुननगर – शेलगाव क – सौंदे – वरकटणे – कोंढेज रस्ता प्रजिमा 8 सुधारणा करणे.- 2 कोटी 90 लाख,
- आमदार स्थानिक विकास निधी मधून वीर वस्ती नंबर 2 – बोगदा वस्ती येथे सभामंडप बांधणे -7 लाख,
- आमदार स्थानिक विकास निधी मधून नागनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे – 10 लक्ष,
- 25/ 15 योजनेअंतर्गत गुळसडी ते शेलगाव क शिव रस्ता करणे- 4लक्ष,
- जिल्हा नियोजन मंडळ 30 54 अंतर्गत गुळसडी रोड ते माळी वस्ती नं 1 रस्ता खडीकरण करणे- 5 लक्ष ,
- जन सुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी वॉल कंपाउंड बांधणे – 3 लक्ष,
- जि प प्राथमीक शाळा शेलगाव क संरक्षक भिंत बांधणे – 3 लक्ष,
- सिद्धार्थ नगर येथे सिमेंट काँक्रेट गटार बांधणे – 5 लक्ष
- अशा एकूण तीन कोटी 57 लाख रुपये खर्चाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी रामचंद्र कातुळे, पांडुरंग वीर सर, भरत वीर ,उत्तरेश्वर वीर ,सचिन पाटील , सचिन वीर ,आजिनाथ वीर ,सुनील वीर ,गणेश माने ,किरण वीर ,तात्या सांगडे ,विलास वीर ,अण्णा शिंदे , निलेश ननवरे ,अंकुश शिंदे ,विलास कातुरे , आप्पा वीर ,केशव दास ,राहुल कुकडे ,प्रवीण जगताप ,अमोल बनसोडे ,प्रवीण बनसोडे , लखन डावरे ,भास्कर वीर ,सुनील माने ,विक्रांत वीर, अभिमान वीर , नानासाहेब वीर ,प्रशांत वीर ,महादेव वीर ,बापू चोपडे ,धनंजय पायगन ,अशोक माने , दिनकर पायगन , नागेश पायगन ,पितांबर कुकडे , आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कुकडे ,केशव दास , गणेश माने ,सुनील माने यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माजी सरपंच अशोक काटुळे सर , मा.सरपंच अंकुश जाधव ,ग्रामपंचायत सदस्य धर्मराज शिंदे ,रोपळे गावचे उपसरपंच दळवे यांची भाषणे झाली. कार्यक्रमा चे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर विकास वीर यांनी केले तर आभार धर्मराज शिंदे यांनी मानले.




