वाशिंबे परिसरातील विविध विकासकामांचे गणेश चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण संपन्न -

वाशिंबे परिसरातील विविध विकासकामांचे गणेश चिवटे यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

0

करमाळा  – भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा  जिल्हा नियोजन समिती सदस्य मा. गणेश भाऊ चिवटे यांच्या हस्ते वाशिंबे परिसरातील विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवार, दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्यात ग्रामपंचायत वाशिंबे अंतर्गत एकूण सुमारे ३९ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले असून, या सर्व कामांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.

कामांची माहिती पुढीलप्रमाणे

  • भैरवनाथ मंदिर ऑल कंपाऊंड व पेव्हर ब्लॉक बसवणे — ७ लाख रुपये (कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८:३० वा.)
  • दलित वस्ती गावठाण गार्डन पेव्हर ब्लॉक बसवणे — ७ लाख रुपये
  • दलित वस्ती गायकवाड वस्ती येथे स्ट्रीट लाईट दिवे बसवणे — ७ लाख रुपये
  • सोगाव-वाशिंबे शिवरस्ता मुरुमीकरण करणे — ३ लाख रुपये
  • समशानभूमी दुरुस्ती व पेव्हर ब्लॉक बसवणे — ५ लाख रुपये
  • पवार वस्ती येथे भगीरथ डीपी बसविणे — १० लाख रुपये

या सर्व विकासकामांमुळे वाशिंबे गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार असून, ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातही सोय व सुविधा वाढतील.

कार्यक्रमाचे आयोजन सरपंच तानाजी झोळ, मा.उपसरपंच अमोल पवार  यांनी केले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव,भाजपा तालुका अध्यक्ष काकासाहेब सरडे , मा.सरपंच प्रताप झोळ उपस्थित होते

या प्रसंगी गणेश चिवटे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधून पुढील काळातील विकास कामासंदर्भात चर्चा केली व पुढील काळात पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  वाशिंबे गावाला विकास निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य,गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!