रावगाव येथे साडे आठ कोटींच्या विविध कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : रावगाव (ता. करमाळा) येथे सोमवार दिनांक ११ मार्च रोजी करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार व करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला.
यामध्ये रावगाव पंचक्रोशीसाठी ३ कोटी ३९ लाख निधीचे ३३/११ केव्हीचे सबस्टेशन मंजूर झाले आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत रायगाव-वडगाव-हिवरवाडी ५ कोटी २९ लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे देखील भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
याचबरोबर रावगाव येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रयत्नाने रावगावचे हरियाली योजना व जलजीवन योजना यामध्ये नाव सामाविष्ट केले आहे.

यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य अनिल पवार होते तसेच सतीश बापू शेळके अ,ंड राहुल सावंत विवेक येवले बापूराव गायकवाड शंकर जाधव सुजीत बागल भोसे चे सरपंच भोजराज सुरवसे राजेंद्र बाबर दत्ता अडसूळ सौ लीलावती कांबळे वीट चे सरपंच श्रीराम गणगे भाऊसाहेब काळे रघुनाथ काळे देवळाली गावचे माजी सरपंच आशिष गायकवाड वाशिंबे गावचे माजी सरपंच प्रताप झोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय अभिषेक गायकवाड उपाध्यक्ष अशपाक सयद विटचे माजी सरपंच उदय ढेरे बापू तांबे विकास आबा गोंदकर महावितरणचे उपअभियंता सुनील पवार तसेच कार्यक्रमाचे संयोजक माजी सरपंच दादासाहेब जाधव लिंबेवाडी चे गावचे सरपंच किरण फुंदे वंजारवाडी चे सरपंच प्रवीण बिनवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

