कुंभेज येथे आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : कुंभेज (ता.करमाळा) येथे जलजीवन मिशन योजनेतंर्गत पाणी पुरवठा योजना ( निधी : रक्कम रुपये- 1 कोटी 59 लाख 50 हजार 417) व आमदार स्थानिक विकास निधी मधून मंजूर करण्यात आलेले साळुंखे वस्ती येथे तालीम बांधणे ( निधी : रक्कम रुपये – 15 लाख) या कामांचे भूमिपूजन करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी लव्हे गावचे सरपंच मा.विलासदादा पाटील, महाराष्ट्र केसरी पै.मा.चंद्रहासबापू निमगीरे,पै.अनिल फाटके,पै.मा.अगस्ती मुटके,मा.महावीर आण्णा साळुंखे,ग्रा.पं.सदस्य,मा.आण्णा साळुंखे,वरकटणे गावचे सरपंच मा.बापू तनपुरे,कोंढेज गावचे मा.आप्पा आरणे,मा.रमेश गायकवाड,मा.नामदेव मुटके,मा.रावसाहेब सातव,मा.नितीन भोसले,मा.संतोष शिंदे,मा.आबा काटे,मा.रमेश काळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.संजयमामा शिंदे म्हणाले की, विविध विकास कामे करत राहणे, वेगवेगळ्या योजनांना निधी आणणे या गोष्टीला आपले प्राधान्य असते. केलेल्या कामाचा गवगवा करणे, भूमिपूजन, उद्घाटन करणे, पाणी पूजन करणे याच गोष्टीला जर मी वेळ देत बसलो तर इतर विकास कामे राबविण्यासाठी आपल्याकडे वेळ राहणार नाही त्यामुळे मी अशा प्रसिद्धीच्या कामांना फाटा देत असतो .परंतु उद्घाटन दिसत नाहीत याचा अर्थ विकास थांबला असा होत नाही तर ज्या त्या गावांमध्ये …ज्या त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती विकासकामे सुरू आहेत आणि त्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू असतो . कुंभेज साठीही रस्ते, पाणी, तालीम यासाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला असून, भविष्य काळामध्ये कुंभेज या ठिकाणी सब स्टेशन झालेच पाहिजे या दृष्टीने माझे नियोजन सुरू आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य अण्णा साळुंखे यांनी मानले.