सौंदे येथील रस्ता काँक्रीटीकरणाचे बागल यांच्या हस्ते भूमिपूजन
करमाळा (दि.८) – करमाळा तालुक्यातील सौंदे येथे जिल्हा वार्षिक आराखडा अंतर्गत जन सुविधा योजनेमधून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय बागल यांच्या निधी मधून सौंदे येथील श्री मनोहर स्वामी महाराज ते मारुती मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी ५.०० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे भूमिपूजन दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मकाइचे चेअरमन दिनेश भांड वलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, मकाई संचालक सतीश बापू नीळ,बागल गटाचे कट्टर समर्थक व सरपंच जोतीराम लावंड मेजर, अंगद लावंड, सोसायटी चेअरमन दत्ता जगताप, माजी चेअरमन ब्रह्मदेव गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य जोतीराम गावडे, गणेश शहाजी डूकळे ,पोपट आवटे माजी सरपंच रवींद साळुंके, पोलीस पाटील सतीश पाटील, पंडित पाटील, दगडु आवटे आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार अंगद लावंड यांनी मानले.