जातेगाव येथे एक कोटी वीस लाख रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा (दि.६) – जातेगाव (ता. करमाळा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावातील अंतर्गत रस्ते, सिमेंट काँक्रेट गटारी व दोन सभागृह यासाठी एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी दिला असून या माध्यमातून जातेगाव च्या विकासात भर पडणार आहे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले
जातेगाव येथील हिम्मतराव शिंदे तुषार शिंदे सुनील शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे शहर प्रमुख संजय शीलवंत उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे युवासेना प्रमुख नवनाथ गुंड ओबीसी जिल्हा संघटक सुरेश करचे माधव सूर्यवंशी शहरप्रमुख अंकुशराव जाधव आजिनाथ इरकर बाबा तुरणे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचे नेतृत्वाखाली भेट घेऊन गावाच्या निधीसाठी मागणी केली होती
यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एक कोटी वीस लाख रुपये मंजूर केले. जातेगाव चा इतिहासात आत्तापर्यंत गावातील अंतर्गत कामासाठी मिळालेला हा विक्रमी निधी असून याची उतराई आम्ही येणारे निवडणुकीत शिवसेना-भाजप राष्ट्रवादी युतीला मतदान करून करणार आहोत असे सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की एक गरीब कुटुंबातला माणूस मुख्यमंत्री झाला हे अनेकांना खपले नाही त्यामुळे शरद पवार सहित सगळ्यांच्या पोटात गोळा उठला आहे. पण सर्व जनतेच्या आशीर्वादावर पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार आहे असा दावा केला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळे घर कामाला कपडे धुवायला भांडी धुवायला भांड्याला महिला कामाला मिळणार नाही यामुळे ही योजना बंद करा अशी बांधणी काँग्रेसवाले करत आहेत ही निंदनीय गोष्ट आहे यामुळे आता तालुक्यातल्या राज्यातील सर्व महिलांनी महाविकास आघाडीला धडा शिकवावा असे आव्हान केले. सरपंच छगन ससाणे उप सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी आभार मानले

दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद मार्फत शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा एस. आर. पी. एफ, दहा नंबर, सोरेगाव, जिल्हा सोलापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यामधील ११ तालुक्यातून विजयी झालेले विविध खेळातील विविध खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील खेळाडू सिद्धार्थ मंजुळे हा २०० मीटर धावणे या खेलबाबी मध्ये करमाळा तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. आज झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धच्या २०० मीटर धावणे मध्ये त्याने जिल्हास्तरावर विजय प्राप्त करून त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सिध्दार्थला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.रामकुमार काळे व अंकुश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





