श्रीदेवीचामाळ रोडवरील काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसविणे या कामाचे झाले भूमिपूजन -

श्रीदेवीचामाळ रोडवरील काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसविणे या कामाचे झाले भूमिपूजन

0

करमाळा (दि.२) –  करमाळा ते श्री देवीचामाळ या रोडवरील गादीया घर ते नेटके हॉस्पिटल यादरम्यान काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसविणे या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि. २८) शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील हस्ते झाले. करमाळा शहरातून देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूने वृध्दांना पहाटे व सायंकाळी फिरण्यासाठी २८० मीटरचा फुटपाथ यातून तयार केला जाणार आहे.

या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतुन ५० लाख रुपयांचा निधी दिल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे. महेश चिवटे यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे.

यावेळी शहरप्रमुख संजय शीलवंत, शैलेश खडके, विश्वासराव काळे पाटील, आजिनाथ इरकर,बाबासाहेब तोरणे, दिगंबर देशमुख, भगत, संजय जगताप, निलेश चव्हाण, नागेश चेंडगे, केशव साळुंखे, पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते.

करमाळा शहरात पहाटे व सायंकाळी वृध्दांना फिरण्यासाठी एक पादचारी मार्गाची गरज होती. फुटपाथवर वृध्दांना बसण्यासाठी खुर्च्या, वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्क करण्यात येणार असल्याची माहिती ठेकेदार संतोष गुगळे यांनी दिली आहे. पुढील काळात या रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये याची काळजी नगरपालिकेने घ्यावी, अशी मागणी जेष्ठ नागरिक संघाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!