कंदर येथे 25 डिसेंबरला सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज यांचा जन्मशताब्दी सोहळा
कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे..
कंदर (ता.22)… : समर्थ सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांचा जन्मशताब्दी अभिष्टचिंतन सोहळा 25 डिसेंबरला कंदर (ता.करमाळा) येथे मा. कृषी अधिकारी औदुंबर लोकरे यांच्या गुरुसेवा मंगल कार्यालयात होणार आहे.
यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे ,पालकमंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती सह राज्यातील अनेक आजी व माजी आमदार, खासदार तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी जन्मशताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
श्री समर्थ सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर यांचा जन्मशताब्दी अभिष्टचिंतन सोहळा 25 डिसेंबरला कंदर येथे सायंकाळी सात वाजून 25 मिनिटांनी संपन्न होणार आहे .या सोहळ्यास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री क्षेत्र इंचगिरी कर्नाटकचे मठाधिपती रेवणसिद्धेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचे वंशज कान्होबा महाराज देहूकर ,आजरेकर फड पंढरपूरचे प्रमुख भागवत महाराज चौरे, माणकोजी बोधले संस्थांचे ॲड जयवंत बोधले महाराज, वासकर फड प्रमुख राणा महाराज वासकर,अ.भा. भाट संघटनेचे अध्यक्ष सुनील मलके व जगदीश दादा महाराज कोल्हापूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज सोलापूरचे सर्व साधक ,भक्तगण यांनी केले आहे.