करमाळा तालुक्यातील धनगर समाज खा.नाईक-निंबाळकर यांच्या पाठीशी : भाजपा जिल्हाचिटणीस विनोद महानवर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील धनगर समाज लोकसभा निवडणुकीत खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असलेची माहिती धनगर समाजाचे नेते विनोद महानवर यांनी दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकारने धनगर समाजासाठी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. धनगर आरक्षणबाबत सर्वोच्च न्यायालयात धनगड व धनगर एकच असलेचे शिफारसपत्र दिले आहेत.
धनगर बांधवाना यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सुरु केली आहे, महामेश योजनेतर्गत शेळी मेंढी पालनासाठी अनुदान मिळत आहे, वसंतराव नाईक महामंडळा मार्फत शेकडो युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊन एकंदरीत राज्य व केंद्र सरकार धनगर समाजाच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे दिसत आहे. अहमदनगर चे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करूण एक प्रकारे धनगर समाजाला न्याय देण्याच काम वेळोवेळी भाजप सरकार करताना दिसत आहे.

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धनगर आरक्षण साठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षण बाबत धनगर समाजाची व्यथा त्यांच्या ध्यानात आणून दिली होती धनगर समाज विसरणार नाही .खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या दोन वर्षात माढा लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे पुर्ण केली आहेत.गेली अनेक वर्ष प्रलंबीत असलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावले आहेत. करमाळा तालुक्यातील जातेगांव टेंभूर्णी हायवे मंजूर केला आहे. अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीत खा. निंबाळकर यांनी विकासकामाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे खा.नाईक-निंबाळकर यांचे मागे तालुक्यातील धनगर समाज निश्चितच उभा राहील यासाठी असा आम्हाला आत्मविश्वास आहे असे महानवर यांनी म्हटले आहे.



